राळेगण सिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीमधल्या ऑफिसमध्ये एकानं आत्महत्या करायचा प्रयत्न केला आहे.
बाळू असं या व्यक्तीचं नाव आहे, अशी माहिती पीटीआयला पोलिसांनी दिली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अण्णांच्या ऑफिसमध्ये विष घेतलेली ही व्यक्ती शेतकरी असून जमिनीच्या वादातून त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान जमिनीचा वाद हा कोर्टात सोडवावा, आत्महत्या हा त्यावरचा उपाय नाही, अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर अण्णा हजारे यांनी दिली आहे.