सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या महासभेत काँग्रेसच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला.
काँग्रेस आणि स्वाभिमानीच्या एका गटाच्या नगरसेवकांनी महासभा उधळण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात महापौर आणि नगरसेवक एकमेकांवर धावून गेले. यावेळी नगरसेवकांनी निवडीचं पत्रं फाडलं.
गोंधळानंतर महापौरांनी महासभेतून काढता पाय घेतला. स्थायी समितीमध्ये स्वाभिमानी आघाडीच्या सदस्यांची नाव जाहीर करावी, अशी काँग्रेसच्या एका गटाची आणि स्वाभिमानीच्या नगरसेवकांची मागणी होती. तर स्वाभिमानी आघाडीच्या मान्यतेबाबत न्यायालयाचा निर्णय झाल्यावर नावं जाहीर करू, अशी महापौरांची भूमिका होती.
गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा महापौर हारून शिकलगार यांनी दिलाय. तर गोंधळ घालणं योग्य नाही, मात्र महापौर नगरसेवकांच्या अंगावर धावून येत असतील तर ते कितपत योग्य आहे, असा सवाल काँग्रेस नगरसेवकांनी केलाय.