मैत्रिणीसोबतच्या वादामुळे मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

मैत्रिणीबरोबर झालेल्या वादामुळं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनींने गुरुवारी औरंगाबादमध्ये रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केलीय. 

Updated: Jun 17, 2016, 12:32 PM IST
 मैत्रिणीसोबतच्या वादामुळे मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या title=

औरंगाबाद : मैत्रिणीबरोबर झालेल्या वादामुळं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनींने गुरुवारी औरंगाबादमध्ये रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केलीय. 

प्रतीक्षा मोतीराम वाघ असं या तरुणीचे नाव असून ती औरंगाबादची रहिवाशी आहे. ही विद्यार्थिनी अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत होती. मैत्रिणीने तिच्या मोबाईलवर पाठवलेल्या मेसेजमुळे हा प्रकार समोर आलाय. 

औरंगाबादमध्ये बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर तिने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षात प्रवेश घेतला होता. त्याठिकाणी ती मुलींच्या वसतिगृहामध्ये राहत होती. 

परीक्षा संपून सुट्या लागल्याने प्रतिक्षा गेल्या महिन्यापासून औरंगाबादमध्ये आली होती, मात्र तिच्या कुटुंबियांना या प्रकारची पुसटशाही कल्पना नव्हती. गुरुवारी अभ्यासिकेत जात असल्याचे सांगून ती घराबाहेर पडली. जवळच असलेल्या रेल्वे रुळावर तिने पॅसेंजर रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली.