मेट्रो रेल कंपनीत नोकरीचे आमिष, नागपुरात लाखो रुपये उकळलेत

नागपुरात मेट्रोचं काम पूर्णपणे सुरूही झालेलं नाही तर मेट्रो रेल कंपनीत नोकरी लावून देतो, असं आमिष दाखवत फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झालाय. या प्रकरणात सहा आरोपींना अटक झाली. मात्र प्रमुख आरोपी फरार आहे.

Updated: Dec 25, 2015, 10:50 PM IST
मेट्रो रेल कंपनीत नोकरीचे आमिष, नागपुरात लाखो रुपये उकळलेत title=

नागपूर : नागपुरात मेट्रोचं काम पूर्णपणे सुरूही झालेलं नाही तर मेट्रो रेल कंपनीत नोकरी लावून देतो, असं आमिष दाखवत फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झालाय. या प्रकरणात सहा आरोपींना अटक झाली. मात्र प्रमुख आरोपी फरार आहे.
 
मेट्रोचं काम सुरू झालंय. चार ते पाच वर्षात सेवा नागपुरात सुरू होईल. पण प्रत्यक्षात ही सेवा सुरू होण्यासाठी बराच अवधी असला तरीही मेट्रो रेलच्या नावाने फसवणूक होत असल्याचं सिद्ध झालंय. मेट्रो रेल कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या सबबीखाली नागपुरात एका टोळक्याने शिक्षित बेरोजगारांना फसवलंय. 

नोकरीसाछी इच्छूक तरूणांना हेरून या टोळीने त्यांना एसएमएस पाठवला. नागपूरच्या पारडी परिसरातील मेहेर सेलिब्रेशन हॉलमध्ये इंटरव्ह्यू घेणार असल्याचं घोषित केलं. उमेदवारांकडून २ हजार ते १ लाख रूपयांपर्यंत पैसे उकळले. पण एका जागरूक नागरिकामुळे हा प्रकार उघड झाला. 

आलेल्या तक्रारीनंतर इंटरव्ह्यू सुरू असतानाच पोलिसांनी तिथे धाड टाकली. आयोजकांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी एका महिलेसह ६ जणांना ताब्यात घेतले. मात्र प्रमुख आरोपी अनिल पांडे अजून फरार आहे. 

नागपूरचा संबंधित टोळक्याचा प्लॅन फसला. पुढच्या टप्प्यात गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातही अशाच प्रकारे फसवणूक करण्याचा त्यांनी बेत आखला होता.