पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये भाजपची रिपाइं (आठवले गट) बरोबर युती झाल्याने त्याचा फायदाच झाला. रिपाइंने भाजपच्या उमेदवारांना मतदान केले. त्यात त्यांचेही पाच नगरसेवक निवडून आले. त्यामुळे रिपाइंला उपमहापौर पद देण्यात यावे, अशी मागणी खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून, भाजपचा पहिल्यांदाच महापौर होणार आहे. या निवडणुकीमध्ये त्यांची रिपाइं (आठवले गट) यांच्याबरोबर युती झाली. परंतु, रिपाइंचे उमेदवार कमळाच्याच चिन्हावर लढले होते. त्यांचे पाच उमेदवार निवडून आल्याने आणि त्यांनी भाजपला केलेल्या मतदानाचा फायदाच झाला. देशासाठी डॉ. आंबेडकरांचे योगदान व त्यांचा त्याग मोठा आहे. केंद्र सरकारमध्ये रामदास आठवले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात घेतले. त्याच धर्तीवर पुण्यातही रिपाइंला उपमहापौर पद देण्यात यावे, अशी मागणी खासदार काकडे यांनी केली आहे.