नवी मुंबई : नवी मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंदा म्हात्रे यांच्यासह आजी माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आमदार झालेल्या मंदा म्हात्रे यांनी ज्यांना नगरसेवक पदाच्या निवडणुकीचे आश्वासन दिले होते. ते पाळले गेले नसल्याने सर्वच भपाजप प्रवेशकर्त्यांनी अधिकृत उमेदवारांविरोधात दंड थोपटत अपक्ष अर्ज दाखल केलेत.
यामध्ये दिलीप तिडके, वैशाली तिडके, प्रकाश माटे, संगीता सुतार, शंकर माटे यांच्यासह २५ बंडखोरांचा समावेश आहे. या सर्व इच्छुकांना स्वतः मंदा म्हात्रे यांनी भाजपमध्ये घेऊन उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र नवी मुंबई महापालिका निवडणुकीत या सगळ्यांची तिकीटं कापली गेलीत.
तिकीट कापल्यानं हे सर्व संतापले असून त्यांनी बंडखोरी केलीय. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत त्यांनी थेट भाजपच्या अधिकृत उमेदवारांना आव्हान दिलंय. जो चांगला असेल त्याला जनता निवडणून देईल, असे भाजप बंडखोर संगीता सुतार यांनी म्हटले आहे.
कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर विश्वास ठेवून भाजपमध्ये दाखल झाले. मात्र मंदा म्हात्रे यांच्यासाठी ते हवशे-नवशे-गवशे झालेत, असा आरोप बंडखोरी करणाऱ्यांनी केलाय. नवी मुंबईत शिवसेनेशी युती करण्यात भाजपला यश आलं. मात्र भाजपची सध्या डोकेदुखी वाढलीय ती बंडखोरांमुळं. ज्यांनी अधिकृत भाजप उमेदवारांना घाम फोडलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.