नागपूर : महानगर पालिकेच्या भाजप नगरसेवकांची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत महापौर, उपमहापौर, स्थायी समिति सभापती यांची निवड करण्यात आली आहे.
नागपूरच्या महापौरपदासाठी भाजपने नंदा जिचकार यांचं नाव पुढे केलं आहे तर उपमहापौरपदासाठी दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती पदासाठी संदीप जाधव आणि सत्ताधारी पक्षाच्या नेतेपदी संदीप जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
५ फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर पदाची शपथविधी होणार आहे. नागपूरमध्ये भाजपकडे बहुमत आहे त्यामुळे त्यांना कोणाच्याही पाठिंब्याची गरज भासणार नाही आहे.