नंदुरबार: चिक्की घोटाळ्याचं प्रकरण ताजं असतांनाच नंदुरबार जिल्ह्याती राजविहीर अंगणवाडीत धक्कादायक प्रकार पुढे आलाय. तळोदा तालुक्यातील या गावात चिक्कीत अळ्या आढळून आल्या आहेत.
अळ्या सापडल्याच्या बातमीनंतर प्रशासनात खळबळ उडालीय आणि महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या पथकानं कसलाही विलंब न लावता राजविहीर गावाला भेट दिलीय.
राजविहीर अंगणवाडीतील भूमिका नेहरू पाडवी या मुलीला मिळालेल्या चिक्कीत अळ्या बुरशीजन्य पदार्थ आढळून आल्यानं पंचायत समिती सभापती आकाश वळवी यांनी हा विषय उचलून धरला. याची दखल घेत नंदुरबार जिल्हा परिषदेचे महिला महिला बालकल्याण अधिकारी विजयसिंह परदेशी यांनी राजविहीर इथल्या अंगणवाडीला भेट दिली.
तालुका बालविकास अधिकारी जी. एस. चौधरी यांनी चिक्कीची २५ छोटे पाकिटं ताब्यात घेतली आहे. चिक्कीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. हे नमुने धुळे इथल्या अन्न औषध प्रशासन विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.