नाशिक: नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा धान्य घोटाळ्याप्रकरणी नऊ तहसीलदारांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी या नऊ तहसिलदारांच्या निलंबनाची घोषणा केली होती.
मात्र सचिवांनी निलंबनाची कारवाई करण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळं गिरीश बापट यांनी कॅबिनेटच्या बैठकीत सचिवांच्या भूमिकेबाबत रोष व्यक्त केला होता.
मुख्यमंत्र्यांनीही विधानसभेतल्या घोषणेची तातडीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तातडीनं सूत्र हलवत या सर्व तहसिलदारांचं निलंबन करण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.