उस्मानाबाद जि.प.मध्ये १० वर्षानंतर राष्ट्रवादी सत्तेत

 भाजपच्या ४ सदस्यांनी मतदानाला उपस्थित न राहून राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळं राष्ट्रवादीचे नेताजी पाटील अध्यक्षपदी निवडून आले. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 21, 2017, 04:24 PM IST
 उस्मानाबाद जि.प.मध्ये १० वर्षानंतर राष्ट्रवादी सत्तेत title=

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेवर तब्बल १० वर्षानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकला, तो देखील भाजपच्या मदतीनं. भाजपच्या ४ सदस्यांनी मतदानाला उपस्थित न राहून राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळं राष्ट्रवादीचे नेताजी पाटील अध्यक्षपदी निवडून आले. 

तर आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झालीय. या निवडणुकीत शिवसेनेला पक्षांतर्गत गटबाजी भोवली. शिवसेनेचे २ गायब असलेले सदस्य मतदानाला हजरच राहिले नाहीत. त्यामुळं शिवसेना-काँग्रेस आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला.