बीड : जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांचे एकेकाळी आकर्षण असलेला सौताडा इथला धबधबा तब्बल वीस वर्षानंतर धो धो बरसू लागला आहे.
तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे हा धबधबा ओसंडून वाहतो आहे. बीड आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सौताडा या ठिकाणी रामेश्वर दरीत हा मोठा धबधबा आहे. तीन चार वर्षपासून दूष्काळ असल्याने धबधबा नव्हे तर ही केवळ एक छोटी धार दिसत होती.
मात्र यंदाच्या वर्षी सुरवातीलाच पाऊस झल्यानं हा धबधबा वाहू लागला होता. मात्र गेल्या तीन दिवसापूर्वी झालेल्या तुफान पावसाने या धबधब्याने रौद्ररूप धारण केलय त्यामुळे एक ते दीड हजार फूट उंचीववरुन कोसळणाऱ्या या धबधब्याला पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.