नेपाळ भूंकप थरार अनुभवला पुण्यातील छोट्या गिर्यारोहकांनी

नेपाळचा भूंकप प्रत्यक्ष अनुभवला पिंपरी चिंचवड परिसरातल्या सात छोट्या गिर्यारोहकांनी....  काठमांडू विमानतळावर पोहोचल्यांनंतर लगेचच या सात गिर्यारोहकांनी तो महाप्रलय अनुभवला… 

Updated: May 2, 2015, 10:52 AM IST
नेपाळ भूंकप थरार अनुभवला पुण्यातील छोट्या गिर्यारोहकांनी title=

पुणे : नेपाळचा भूंकप प्रत्यक्ष अनुभवला पिंपरी चिंचवड परिसरातल्या सात छोट्या गिर्यारोहकांनी....  काठमांडू विमानतळावर पोहोचल्यांनंतर लगेचच या सात गिर्यारोहकांनी तो महाप्रलय अनुभवला… 

नेपाळमधील प्रलयंकारी भूकंपातील मृतांची संख्या पंधरा हजारांपर्यंत जाण्याची भीती नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी व्यक्त केली आहे. नेपाळसाठी हा मोठा अडचणीचा काळ आहे. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, नागरिकांना शक्‍य तितकी मदत केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.  

या भूकंपामुळे नेपाळ सरकार हतबल झाले असून, त्यांच्यातर्फे होणारे मदतकार्य अत्यंत सावकाश होत असल्याने नागरिकांना आपल्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी हाताने ढिगारे उपसावे लागत असल्याचे अनेक ठिकाणी दिसत आहे. आंतरराष्ट्रीय मदत येथे पोचण्यास सुरवात झाली आहे. दुर्गम भागात अद्यापही कोणत्याही प्रकारची मदत पोहोचलेली नाही. त्यामुळे जखमी आणि मृतांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.