अंबी गाव, उस्मानाबाद: राज्यात मराठवड्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील अंबी गावातील एका ४० वर्षीय महिलेनं ना रोजगार, ना घरात अन्नाचा कण... पाच मुलांचा सांभाळ करण्यास असमर्थ असल्यानं तिनं रॉकेल ओतून स्वत: पेटवून घेतलं.
गेल्या शनिवारी जेव्हा देशात राखीपौर्णिमेचा सण साजरा केला जात होता. तेव्हा अंबी गावातील मनीषा गटकल पेटत होती. तिच्या घरात ना तांदूळ, ना कणिक... होते फक्त रिकामे डबे आणि भांडे... कुटुंबाजवळ उपजीविकेचं एकही साधन नव्हतं.
आणखी वाचा - राज्यातील दुष्काळाला पवारच जबाबदार, बाळासाहेब विखे पाटलांची टीका
मनीषाचा पती लक्ष्मणनं सांगितलं, "आम्ही खूप गरीब आहोत. घरात खायला काहीही नाही. माझ्याजवळ काही काम नव्हतं, जेव्हा काम मिळालं मी बाहेर गेलो तेव्हा तिनं दरवाजा बंद करून आत्महत्या केली."
गटकल यांच्या एका नातेवाईकांनी सांगितलं, 'रेशनच्या रुपात १८ किलो गहू आणि १२ किलो तांदूळ मिळतात. पण सात लोकांच्या या कुटुंबाला ते पुरेसं नाही आणि १२ दिवसांतच हे धान्य संपतं.'
उस्मानाबाद, सोलापूरसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातीलही अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळामुळे परिस्थिती बिकट आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गतही काम मिळत नाही.
आणखी वाचा - दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र येण्याचं नानाचं राजकारण्यांना आवाहन
लक्ष्मणचे भाऊ बाळासाहेब म्हणाले, जर त्याला नरेगा अंतर्गत काम मिळालं असतं तर त्याच्याजवळ काही पैसे असते. कदाचित तेव्हा मनीषानं आत्महत्या केली नसती. मराठवाड्यात सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळ पडलाय. २०१४ साली ५७४ शेतकऱ्यांनी तर यंदा आतापर्यंत ६२८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.