मुंबई : महाड दुर्घटनेत मानवी चूक नसल्याचं आयआयटी मुंबईच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. ही दुर्घटना नैसर्गिक कारणानेच असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
मे-महिन्यात झालेलं पुलाचं सर्वेक्षण चूकीचं नव्हतं. विक्रमी पाऊस आणि नदीची स्थिती यामुळे ब्रिज कोसळला. असं असलं तरी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे. निवृत्त सहा न्यायधीशांची नावे पुढे आली असून या नावापैकी एक नाव लवकरच निश्चित केलं जाईल.
सावित्री नदीवर नवीन महाड़ ब्रिज बांधण्याच्या कामाल डिसेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यात जे ब्रिज जुने झाले आहेत त्याची तातडीने दुरुस्ती हाती घेण्यात येईल, त्यासाठी 500 रूपये कोटींची तरतूद डिसेंबर अधिवेशनामध्ये करण्यात येईल. तर राज्यातील बाकीच्या सर्व ब्रिजची देखभाल दुरुस्तीसाठी 2500 कोटी रूपये टप्प्याटप्प्याने खर्च केले जातील, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.