जळगाव: कानळदा गावच्या सरपंच आणि त्यांच्या कुटुंबियांनी मारहाण केल्याचा आरोप आरोग्य सेविकेनं केला आहे. प्रतिभा भंगाळे, त्यांचे पती विष्णू भंगाळे आणि त्यांचा मुलगा तसंच ग्रामपंचायत सदस्य निलेश भंगळेंनी आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप आरोग्य सेविका पुष्पा सोनावणे यांनी केला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलीय.
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळणारा १० टक्के शासकीय निधी खर्च करण्यासाठी डॉक्टर आणि सरपंच यांचे संयुक्त बँक खाते असते. हा शासकीय निधी खर्च करण्यासाठी सरपंच आणि वैद्यकीय अधिकारी यांची स्वाक्षरी आवश्यक असते. त्यामुळे कानळदा गावाच्या सरपंच प्रतिभा भंगाळे यांनी स्वाक्षरी घेण्यासाठी पुष्पा सोनवणे या आरोग्य सेविकेला घरी बोलावून घेतले होते.