खाद्यतेलाचा टँकर उलटला, तेल घेण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड

वडूज दहिवडी मार्गावर खाद्यतेलाचा टँकर उलटला.

Updated: Jan 12, 2017, 09:02 PM IST
खाद्यतेलाचा टँकर उलटला, तेल घेण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड  title=

सातारा : वडूज दहिवडी मार्गावर खाद्यतेलाचा टँकर उलटला. हा अपघात सकाळच्या सुमारास झाला असून कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र या टँकरमध्ये खाद्यतेल असल्याची कुणकुण आसपासच्या गावक-यांना लागली.

मकरसक्रांती सणाच्या तोंडावर गावक-यांची तेल उपसण्यासाठी एकच झुंबड उडाली. घरात मिळेल त्या भांड्यात गावक-यांनी हे तेल साठवून ठेवलं. महागाईने खाद्य तेलाचे दर कमालीचे वाढलेत त्याच संधीचा फायदा घेत वर्षभराचे खाद्यतेल गावक-यांनी घराघरात साठवलं.