पालघर : पालघरचे प्रांताधिकारी शिवाजी दावभट यांना ५० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
त्यांच्या सह नायब तहसीलदार सतीश मानिवडे नायब शिवाजी दावभट यांचे ड्राइवर जयेश पाटील यांना पण अटक करण्यात आली आहे.
जमिनीच्या प्रकरणात योहान इराणी यांच्या कडून त्यांच्या बाजूने निकाल देण्या करिता 50 लाखाची मागणी केली होती. दावभट यांना अटक करण्यात आली असून पूढील तपास सूरू आहे.
लाच मागितलेल्या रकमेत तीन लाखाच्या पाचशे रूपयांचा जून्या नोट्या असून 47 लाखांच्या बनावट नोटा होत्या.