नदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर झाली आहे.

Updated: Jul 13, 2016, 12:15 PM IST
नदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल title=

कोल्हापूर : कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर झाली आहे.

अनेक नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्य़ाने आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने मदतीचं काम सुरू केलं आहे. रात्री उशीरा 'राष्ट्रीय आपत्ती निवारण दला'ची (NDRF) टीम दाखल झाली असून, मदत कार्याला सुरूवात केली आहे. 

पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट असून सध्या ४४ फूट आठ इंचावर ती वाहत आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर नद्यांची आहे.

पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्यातून एनडीआरएफचे ४० जवान आणि सहा बोटींसह कोल्हापुरात रात्रीच दाखल झालेत.