आता दररोज वारकऱ्याला मिळणार विठूरायाच्या पूजेचा मान

पंढरपूरमधल्या श्री विठ्ठल मूर्ती पूजेचा मान यापुढं वारकऱ्याला दिला जाणार आहे. विठ्ठल दर्शनासाठी मंदिराबाहेर रांगेत सर्वात पुढे उभ्या असणाऱ्या वारकऱ्याला, स्वतः विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळेल. विठ्ठल मंदिर समितीनं हा निर्णय घेतलाय. 

Updated: Mar 1, 2015, 10:42 PM IST
आता दररोज वारकऱ्याला मिळणार विठूरायाच्या पूजेचा मान  title=

पंढरपूर: पंढरपूरमधल्या श्री विठ्ठल मूर्ती पूजेचा मान यापुढं वारकऱ्याला दिला जाणार आहे. विठ्ठल दर्शनासाठी मंदिराबाहेर रांगेत सर्वात पुढे उभ्या असणाऱ्या वारकऱ्याला, स्वतः विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळेल. विठ्ठल मंदिर समितीनं हा निर्णय घेतलाय. 

आतापर्यंत फक्त आषाढी आणि कार्तिकी एकादशीलाच, सामान्य वारकऱ्यांपैकी एकाला विठ्ठल पूजा करण्याचा बहुमान मिळायचा. मात्र आता हा सुवर्णयोग दरदिवशी, एका वारकऱ्याला मिळू शकणार आहे. 

विठ्ठलाच्या मूर्तीची झीज होत असल्याने मागच्या तीन वर्षांपासून विठ्ठलाची महापूजा बंद करण्यात आली होती. त्यामुळं आजवर केवळ मंदिर व्यवस्थापणानं नियुक्त केलेल्या लोकांकडूनच दैनंदिन पूजा व्हायची. मात्र, येत्या ५ तारखेपासून वारकऱ्यांना, सर्वसामान्य भाविकांना पूजेचा मान मिळणार आहे. त्यामुळं आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या चरणांना स्पर्श करता यावा, ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट आता खरी ठरणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.