सरकारी देणी भरण्यासाठी वापरा ५००, १००० च्या नोटा

तुमची वीज बिल, लाईट बिल, पाणी बिल, प्रॉपर्टी टॅक्स आणि इतर सरकारी देणी बाकी असतील तर यासाठी तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तुम्ही काही दिवस वापरू शकणार आहात. 

Updated: Nov 10, 2016, 03:51 PM IST
सरकारी देणी भरण्यासाठी वापरा ५००, १००० च्या नोटा  title=

मुंबई : तुमची वीज बिल, लाईट बिल, पाणी बिल, प्रॉपर्टी टॅक्स आणि इतर सरकारी देणी बाकी असतील तर यासाठी तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तुम्ही काही दिवस वापरू शकणार आहात. 

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांच्या बंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नागरिकांच्या सोईचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्या रात्रीपर्यंत महावितरणच्या बिलाची रक्कम पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांच्या रुपात भरण्याची मुभा, महावितरणनं ग्राहकांना दिली आहे. मात्र अशा प्रकारे चार हजार रुपयांपर्यंतचीच बिलं ग्राहकांना भरता येणार आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरूनच हा आदेश दिलाय. त्यामुळे वीज बिल आणि इतर सरकारी देणी भरण्यातली ग्राहकांची मोठी अडचण दूर झालीय.