'गजराज'ची मरणयातनांतून सुटका होणार?

सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ असणाऱ्या औंध येथील ६३ वर्षीय गजराज हा वृद्ध हत्ती सद्या मरणयातना भोगतोय. 

Updated: Apr 19, 2017, 08:47 PM IST
'गजराज'ची मरणयातनांतून सुटका होणार? title=

सातारा : सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ असणाऱ्या औंध येथील ६३ वर्षीय गजराज हा वृद्ध हत्ती सद्या मरणयातना भोगतोय. 

'गजराज'ला तातडीनं मुक्त करून त्याच्या या मरणयातना संपवण्याची विनंती पशू अधिकार संघटना 'पेटा'नं महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांना केली आहे. 

मागच्या दशकभरापासून जखमा आणि आजारपणामुळे गजराजची स्थिती बेजार झाली असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वृद्धावस्थेमुळे तो पैसे मागण्यासाठी फिरू शकत नाही. त्यामुळे येथील संस्थानिक गायत्रीदेवी भगवंतराव पंतप्रतिनिधी आणि माहूत यांनी त्याला साखळदंडानी जखडून ठेवले आहे.

हे एक प्रकारचं शोषणच असल्याचं 'पेटा' या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेनं आपल्या संकेतस्थळावर म्हटलंय.