राज्य सरकारनं अधिभार वाढवल्याने पेट्रोल महागलं

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आली आहे. पेट्रोल तीन रुपयांनी महागलं आहे. राज्य सरकारनं पेट्रोलवरील अधिभार वाढवल्यानं पेट्रोलच्या किमतीत ही वाढ झाली असून मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत.

Updated: Apr 22, 2017, 09:03 AM IST
राज्य सरकारनं अधिभार वाढवल्याने पेट्रोल महागलं title=

मुंबई : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आली आहे. पेट्रोल तीन रुपयांनी महागलं आहे. राज्य सरकारनं पेट्रोलवरील अधिभार वाढवल्यानं पेट्रोलच्या किमतीत ही वाढ झाली असून मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत.

महाराष्ट्रात प्रती लिटर पेट्रोलवर 6 रुपये अधिभार लावण्यात येतो. मात्र आता राज्य सरकारच्या वित्त मंत्रालयाने हा अधिभार वाढवून 9 रुपये केला आहे. त्यामुळे पेट्रोल तीन रुपयांनी महागलं आहे.