नागपूर : शुभम महकाळ खून प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. Cloud seven पबचे मालक प्रमोद बम्ब्रोटवार याला अम्बाझरी पोलिसांनी केली. पब मधील मारहाणीत शुभमचा खून करण्यात आला.
सोमवारी नागपूरच्या गाजलेल्या खुनाच्या प्रकरणातील सीसीटीव्ही दृश्ये झी २४तासच्या हाती लागली असून यामध्ये भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांनी बारमध्ये कसा धुडगूस घातला. ते स्पष्ट दिसत आहे. रविवारी मध्यरात्री समतानगर भागातील एका बारमध्ये शुभम महाकाळकर नावाच्या तरुणाचा खून झाला होता. बारमध्ये प्रथम जेव्हा भांडणास सुरुवात झाली त्याता खोपडेंचा मुलगा सहभागी होता. पुढे याच भांडणातून युवकाचा बारमालकाकडून खून झाल्याचं समोर आलं आहे.