जळगाव : शहर आणि खेड्यापाड्यातील गल्लोगल्ली कल्हईवाला कलई, तांबे पितल के बर्तन को कलई करलो कल्हई, असा आवाज आता कानावर पडत नाही, या व्यवसायात पैसे फारसे मिळत नाहीत, दूरवर फिरूनही भांडे कल्हईला फारसा उत्साह नाही, कारण लोकांच्या रोजच्या वापरात पितळाच्या भांड्यांची जागा आता स्टेलनेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली आहे, काही दिवसांनी कल्हई करणारेही दुर्मिळ होणार आहेत.
तांब्याच्या भांड्यांचाही वापर फार मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. रात्रीच्या वेळी तांब्याच्या भांड्यात भरलेले पाणी सकाळी पिल्यास, शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते, असं म्हटलं जात होतं. मात्र तांबे आणि पितळाची भांडी महाग, त्यातल्या त्यात त्यांना घासण्यासाठी लागणारी मेहनत या गोष्टींमुळे ही भांडी आता मागे पडली आहेत.
तांबा तसेच पितळेच्या भांड्यांचा वापर आता केवळ मोठमोठ्या हॉटेल्समध्ये होतो, महागाईचा फटका कल्हई व्यवसायालाही बसला आहे. कोळसा, कथिलचेही भाव वाढल्याने कल्हई करण्यासाठी आता प्रत्येक भांड्यासाठी आकाराप्रमाणे दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत घेण्यात येतात.
पितळाच्या भांड्यातलं अन्न अधिक रूचकर असल्याने याच भांड्यात खाण्याचा आग्रह घरातील ज्येष्ठ मंडळीचा असायचा, पण आता तो काळही मागे पडलाही, शिवाय कल्हई करण्यासाठी कोळसा तसेच कथिलचा भावही वाढला आहे. यामुळे कल्हई हा व्यवसाय नामशेष होत आहे.
तांबे पितळाच्या भांड्याची आठवण आता फक्त देवपूजा आणि कन्यादान करतांनाच लोकांना येते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.