...जेव्हा वाळू माफियांना सोडण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा फोन जातो!

वाळूमाफियाची दादागिरी मोडून काढण्याची भाषा सरकार करत असताना मंत्री मात्र मदत करत असल्याचं उघड झालंय. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी वाळू माफियांची पकडलेली वाहनं सोडण्यासाठी अधिका-यांना फोन केल्याचा आरोप होतोय... बावनकुळेंनी मात्र हे आरोप फेटाळलेत. भाजपकडून मात्र बावनकुळेंची पाठराखण होतेय. 

Updated: Jun 18, 2015, 10:16 PM IST
...जेव्हा वाळू माफियांना सोडण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा फोन जातो! title=

नागपूर : वाळूमाफियाची दादागिरी मोडून काढण्याची भाषा सरकार करत असताना मंत्री मात्र मदत करत असल्याचं उघड झालंय. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी वाळू माफियांची पकडलेली वाहनं सोडण्यासाठी अधिका-यांना फोन केल्याचा आरोप होतोय... बावनकुळेंनी मात्र हे आरोप फेटाळलेत. भाजपकडून मात्र बावनकुळेंची पाठराखण होतेय. 

वाळू माफियांची दादागिरी मोडून काढण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदे करण्याची भाषा करत असतानाच राज्याचे मंत्री मात्र सरकारच्या त्याविरोधातच काम करत असल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालंय. वाळू माफियांवर कारवाई करण्याऐवजी राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रकार घडलाय. 

नागपूर जिल्हा प्रशासनानं पकडलेले वाळू माफियांचे ट्रक कारवाई न करता सोडून देण्याचे आदेश बावनकुळेंनी दिल्याचं समोर आलंय. फेब्रुवारीमधली ही घटना असून शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्याची नोंद झालीय.

यासंदर्भात स्वत: चंद्रशेखर बावनकुळेंना विचारलं असता त्यांनी हे आरोप फेटाळलेत... 'वाळू माफियाला सोडा' असं आपण म्हटलंच नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलीय. तर भाजपनंही बावनकुळेंची पाठराखण केलीय. 
 
खुद्द मुख्यमंत्र्यांच्या शहरातच हा प्रकार घडलाय. त्यामुळे आता मुख्यमंत्री यासंदर्भात काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलंय. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.