सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आज सोलापुरात सत्कार करण्यात आला. सुशील कुमार शिंदे यांचा अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या हस्ते सुशीलकुमार शिंदेंचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. सुशीलकुमार शिंदेंवर पक्षश्रेष्ठींनी सुरुवातीला दुर्लक्ष केल्याचं वक्तव्य करून शरद पवारांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर निशाणा साधला. सुशीलकुमार शिंदेंना काँग्रेसनं शक्ती दिल्याचंही पवार म्हणाले. पंच्च्याहत्तर वर्षांचे झाल्यामुळे आता जपून पावलं उचलण्याची गरज असल्याचा सल्ला पवारांनी सुशीलकुमार शिंदेंना दिला.
40 वर्षांमध्ये मी वाढदिवस साजरा केला नाही. सुरुवातीला गरिबी असल्यामुळे वाढदिवस साजरा न करण्याची सवय लागल्याचं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.