ठाणे : वारंवार दांडी मारणाऱ्या पोलीसमित्रांच्या जागी नवीन पोलीसमित्र नेमण्यात येतील, यासाठी पोलीस मित्रांची हजेरी घेतली जाणार आहे.
राज्यात सर्वत्र ‘पोलीसमित्र’ ही संकल्पना राबवली गेल्याने पोलीस दलाच्या मदतीसाठी हजारो स्थानिक पोलीसमित्र म्हणून पुढे आले आहेत. त्यांनी घेतलेली जबाबदारी ते पार पाडतात की नाही, यासाठी त्यांची हजेरी घेतली जाणार आहे.
पोलीस मित्र ही संकल्पना राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची आहे. पोलीस महासंचालकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी ती संकल्पना राज्यातील पोलीस दलांना राबविण्याचे आदेश दिले.