प्रिमियम ट्रेनकडे कोकणवासीयांची पाठ

कोकणातील गणेशोत्सवासाठी सुरु झालेली एसी डबल ट्रेनचा उपयोग काय, ती कोणासाठी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण ही ट्रेन प्रिमियम ट्रेन म्हणून चालवली जात आहे. यामुळे ही ट्रेन 30 टक्के सुद्धा भरली जात नसल्यांचं या ट्रेनच्या पहिल्या दोन फे-यांवरून स्पष्ट झालं आहे. 

Updated: Aug 25, 2014, 11:49 PM IST
प्रिमियम ट्रेनकडे कोकणवासीयांची पाठ title=

ठाणे : कोकणातील गणेशोत्सवासाठी सुरु झालेली एसी डबल ट्रेनचा उपयोग काय, ती कोणासाठी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण ही ट्रेन प्रिमियम ट्रेन म्हणून चालवली जात आहे. यामुळे ही ट्रेन 30 टक्के सुद्धा भरली जात नसल्यांचं या ट्रेनच्या पहिल्या दोन फे-यांवरून स्पष्ट झालं आहे. 

लोकमान्य टिळक टर्निस ते करमाळी अशी सुरु झालेली ट्रेन शुक्रवारी पहिल्यांदा धावली ती फक्त 132 प्रवासी घेत. 750 प्रवासी आसन क्षमता असलेली ही ट्रेन फक्त 17 टक्के भरली होती. तर रविवारी ही ट्रेन धावली तेव्हा 232 प्रवासी अख्ख्या ट्रेनमध्ये होते. 

एवढा कमी प्रतिसाद मिळण्याचं मुख्य कारण म्हणजे जशी तिकीटे कमी होत जातात तशी तिकीटांची किंमतच वाढत जाते. त्यामुळे एक 625 रुपये किंमतीपासून सुरु होणारी तिकिटांची किंमत ही चार हजांर रुपयांच्या पुढे पोहचली आहे. त्यामुळे या महागड्या गाडीकडे कोकणवासींनी पाठ फिरवल्याचं स्पष्ट झालं आहे. 

तेव्हा गणपती स्पेशल असलेल्या, महागडी ठरलेल्या ट्रेनचा उपयोग काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.