राज्यात २२ नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव, वित्तमंत्री मुनगंटीवारांची माहिती

राज्यात लवकरच नवे २२ जिल्हे तयार होण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारनं २२ नवीन जिल्हे आणि ४९ तालुक्यांच्या निर्मितीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलीय. 

Updated: Aug 16, 2015, 07:09 PM IST
राज्यात २२ नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव, वित्तमंत्री मुनगंटीवारांची माहिती title=

अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर: राज्यात लवकरच नवे २२ जिल्हे तयार होण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारनं २२ नवीन जिल्हे आणि ४९ तालुक्यांच्या निर्मितीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलीय. 

या समितीमध्ये वित्त, महसूल नियोजन विभागाचे सचिव आणि विभागीय आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचाही समावेश आहे.  

राज्यात सध्या ३६ जिल्हे आणि २८८ तालुके आहेत. मात्र यातील काही जिल्हे आणि तालुक्यांची ठिकाणं ही भौगौलिकदृष्ट्या गैरसोयीची असल्याची तक्रार सर्वपक्षीय नेत्यांकडून वारंवार केली जाते. सध्या राज्यात २२ नवीन जिल्हे आणि ४९ तालुका निर्मितीची मागणी केली जात आहे. 

एका जिल्ह्यासाठी ३५० कोटी रुपयांचा खर्च 

एका जिल्ह्याच्या निर्मितीसाठी सुमारे ३५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून राज्यावर अगोदरच कर्जाचा डोंगर आहे. अशा स्थितीत नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचा भार सरकारला झेपेल का असा सवालही उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली असून या समितीला ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

पाहा कोणते आहेत प्रस्तावित नवीन जिल्हे
 
- खामगाव  
- पुसद  
- अचलपूर  
- साकोली
- चिमूर
- अहेरी 
- भुसावळ
- उदगीर
- अंबेजोगाई
- किनवट
- शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर 
- मालेगाव, कळवण 
- मानदेश
- शिवनेरी
- जव्हार
- मीरा भाईंदर, कल्याण
- मानगड
- महाड

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.