चितळे बंधूचे संस्थापक भाऊसाहेब यांचे निधन

 रघुनाथराव ऊर्फ भाऊसाहेब चितळे यांचे रविवारी सकाळी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले.

Updated: Mar 20, 2016, 05:53 PM IST
चितळे बंधूचे संस्थापक भाऊसाहेब यांचे निधन title=

पुणे :  रघुनाथराव ऊर्फ भाऊसाहेब चितळे यांचे रविवारी सकाळी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधु मिठाईवालेचे संस्थापक होते. भाऊसाहेब चितळे यांनी पार मेहनत, कष्ट करुन ग्राहकांचा विश्वास संपादन केला आणि देशभरात चितळे बंधू मिठाई व्यवसायाचा विस्तार केला. 

चितळे बंधु हा आज जगप्रसिद्ध ब्राण्ड आहे. रघुनाथराव ऊर्फ भाऊसाहेब यांनी १९५० मध्ये चितळे बंधू मिठाईवालेची स्थापन केली. चितळे बंधुंच्या मिठाबरोबरच बाकरवडी प्रसिद्ध आहे. चवदार बाकरवडीचा विषय निघताच सर्वप्रथम चितळे बंधुंचे नाव समोर येते
     
रघुनाथरावांचे वडिल भास्कर गणेश उर्फ बाबासाहेब चितळे यांनी १९४० साली डेअरी व्यवसाय सुरु केला. मात्र भाऊसाहेबांनी डेअरी व्यवसायापुरतेच मर्यादीत न रहाता त्यापेक्षा मोठे स्वप्न बघितले.