पुणे : पुण्यात फरासखाना पोलीस चौकीजवळ 10 जुलैला स्फोट नेमका कसा झाला होता याचं सीसीटीव्ही फुटेज झी 24 तासच्या हाती आलेय.10 जुलैला दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी हा बॉम्बस्फोट झाला होता.
या घटनास्थळाच्या जवळच एका दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात हे दृष्य क़ैद झालं होतं. 10 जुलैला दुपारी साधारण 12 वाजून 51 मिनिटांनी अचानक फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका दुचाकीत स्फोट झाला आणि एकच खळबळ उडाली.
(व्हिडिओ) ही ती दृश्य आहेत ज्यामुळे पुणे पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरलं होतं. बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी दहशवादविरोधी पथकानं 10 पथकं रवाना केल्याची माहिती एटीएसनं दिलीय. दरम्यान हा स्फोट नेमका कोणत्या दहशतवादी संघटनेनं घडवून आणला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी मोडस ऑपरेंडीवरुन हा बॉम्बस्फोट इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेनं केल्याचा संशय आहे.
पाहा : पुणे बॅाम्ब स्फोटाच सीसीटीवी फूटेज
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.