पुणे : खुशी परमार... अवघ्या 13 वर्षांची चिमुरडी.... वयाच्या 5 व्या वर्षापासूनच खुशी पोहण्याचा सराव करतेय... गेल्या काही वर्षातच तिनं सलग पाच तासांहून अधिक काळ पोहण्याचा विक्रमही केला होता. मात्र स्कुबा डाईविंगसारख्या जल क्रिडाप्रकारात तब्बल दोन तास डाईव्ह करण्याचा नवा रेकॉर्ड तिनं आता नोंदवलाय.
खुशी सध्या पुण्याच्या माऊंट कारमेल कॉनव्हेंट हायस्कूलमध्ये शिकतेय. विशेष म्हणजे या वयात स्कुबा डाईविंगचं लायस्न्स मिळवणं हा देखील एक विक्रमच म्हणावा लागेल. तिच्या या यशाला साथ मिळाली ती तिच्या वडिलांची.
खुशी परमारच्या या रेकॉर्ड्सची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स तसंच इंडियन अचिव्हर्स अशा जगभरातील विक्रमांची नोंद घेणाऱ्या संस्थांनी घेतलीये.
स्विमिंग आणि स्कुबा डायविंगमध्ये रेकॉर्ड केल्यानंतर खुशीला अंतराष्ट्रीय स्तरावरच्या जलतरण स्पर्धांमध्येही यश मिळवायचंय. 20 - 20 ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून द्यायचा निर्धारही तिनं केलायं. या जलपरीच्या कारकिर्दीला शुभेच्छा.