पंचशील ग्रुपचे चेअरमन अजय चोरडिया यांची आत्महत्या

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील प्रसिद्ध उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक अजय चोरडिया यांनी चिंचवड इथल्या हॉटेलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडलीय. 

Updated: Oct 27, 2014, 06:44 PM IST
पंचशील ग्रुपचे चेअरमन अजय चोरडिया यांची आत्महत्या title=

पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील प्रसिद्ध उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक अजय चोरडिया यांनी चिंचवड इथल्या हॉटेलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडलीय. 

दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलंय. अजय चोरडिया हे पंचशील हॉटेलचे चेअरमन होते. ४८ वर्षीय चोरडिया यांनी त्यांच्याच ‘डबल ट्री हिल्टन’ या चिंचवडमधील हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं.

घटनेची माहिती मिळताच चोरडिया यांना चिंचवडमधील निरामय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. चोरडिया यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र चोरडियांसारख्या मोठ्या व्यावसायिकाने आत्महत्या केल्याने, खळबळ उडाली आहे.

अजय हे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सुप्रसिद्ध बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक ईश्वरदास चोरडिया यांचे पुत्र तर अतुल चोरडिया यांचे बंधू आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.