पुणे : पुणे महापालिकेत भाजप एकहाती सत्ता आल्यावर पालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य करांमध्ये तब्बल 12 टक्क्यांची घसघशीत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलाय.
आयुक्तांनी स्थायी समितीसमोर सादर केलेल्या अर्थसंकल्पात पाणी पट्टीमध्येही 15 टक्के वाढ सूचवण्यात आलीय. पुण्याचे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सादर केला.
त्यात सुमारे पाच हजार सहाशे कोटींच्या या अर्थसंकल्पात सुमारे अकराशे कोटी रुपये पाणीपुरवठ्यासाठी राखून ठेवण्यात आलीय...