पुण्यातील गणपतीचे दागिने चोरणाऱ्याला वडिलांनीच करवली अटक

पुण्यात काल शारदा गणेश मंदिरातून चोरीला गेलेलं सोनं परत मिळालंय. विशेष म्हणजे चोरट्याच्या वडिलांनीच हे दागिने परत आणून दिले. तर चोरट्याला पुण्यात शिवाजी नगर न्यायालयात पुन्हा चोरी करताना पोलिसांनी पकडलंय. 

Updated: Jul 9, 2015, 08:47 PM IST
पुण्यातील गणपतीचे दागिने चोरणाऱ्याला वडिलांनीच करवली अटक title=

नितीन पाटणकर, झी मिडिया, पुणे: पुण्यात काल शारदा गणेश मंदिरातून चोरीला गेलेलं सोनं परत मिळालंय. विशेष म्हणजे चोरट्याच्या वडिलांनीच हे दागिने परत आणून दिले. तर चोरट्याला पुण्यात शिवाजी नगर न्यायालयात पुन्हा चोरी करताना पोलिसांनी पकडलंय. 

पुण्याच्या प्रसिद्ध अखिल मंडई मंडळाच्या शारदा गणेश मंदिरातून चोरीला गेलेलं सगळं सोनं परत मिळालंय. आरोपी विजय कुंडलेनं बुधवारी पहाटे मंदिराच्या खिडकीची काच फोडून मूर्तीवरचे दागिने घेऊन पोबारा केला होता.  हे सर्व दागिने  स्वतःच्या अंगावर घालून हा आरोपी स्वतःच्या घरी गेला. हा सर्व प्रकार आरोपीच्या वडिलांच्या लक्षात आला. त्यानंतर ते सगळं सोनं घेऊन कोथरूड पोलिसांकडे हजर झाले. 

वडिलांनी दागिने काढून घेतल्यानंतर आरोपी विजय कुंडले पुन्हा घरातून गायब झाला. तो फरार होता. शिवाजीनगर कोर्ट परिसरात चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. अगोदर देवतेच्या आणि नंतर न्यायदेवतेच्या परिसरात चोरी करू पाहणा-या या चोराची पुण्यात चांगलीच चर्चा रंगलीय. आणि त्याचवेळी चोराच्या वडिलांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचं कौतुकही होतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.