खडसे यांना मुख्यमंत्र्यांनीच बडतर्फ करावे-विखे

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी, भ्रष्ट मंत्र्यांना बडतर्फ करण्याऐवजी त्यांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक खिडकी योजना सुरू केल्याचा आरोप केला आहे

Updated: May 30, 2016, 01:41 PM IST
खडसे यांना मुख्यमंत्र्यांनीच बडतर्फ करावे-विखे title=

श्रीरामपूर  : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी, भ्रष्ट मंत्र्यांना बडतर्फ करण्याऐवजी त्यांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक खिडकी योजना सुरू केल्याचा आरोप केला आहे

पत्रकारांशी यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी दाऊद इब्राहिमच्या संभाषणाची टेप सध्या चर्चेत आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून खडसे यांनी राजीनामा द्यावा, किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावे.

'खडसे यांच्यावर दाऊदला दूरध्वनी केल्याचा गंभीर आरोप झाला. केंद्रीय मंत्री राजनाथसिंह आणि राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले. खडसे राजीनामा देत नसतील, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावे,' अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.