लातूर : मराठवाड्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यासाठी लातूरमध्ये आलेल्या विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यावर तोफ डागली आहे. जपानमध्ये आढावा घेवून मुख्यमंत्री राज्याला मदत करणार आहेत का, असा सवाल उपस्थित केला.
दुष्काळावर सरकारच्या संवेदना हरविल्याची टिका विखे-पाटील यांनी केलीय. ते लातूरमध्ये बोलत होते. दरम्यान दुष्काळी दौऱ्यात सरकारने विरोधीपक्षाला सोबत घेण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर यांनी मध्यस्थी करण्याचे स्वागत करून नानांनी मुख्यमंत्र्यांचे मन वळविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवस दुष्काळी भागाचा दौरा करून पाहाणी केली होती. यावेळी शेतकऱ्याला काहीही कमी पडू देणार नाही, असे आश्वासून मुख्यमंत्र्यांनी दिले होते. याचा समाचार विखे-पाटील यांनी घेतला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.