सांगली : राज्यातील अनेक नेत्यांच्या वारसदारांना मतदारांनी नाकारलं ते चांगलं झालं, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय.
सदाभाऊ खोत यांचा मुलगा निवडणुकीत पडला याबद्दल मला सहानभुती वाटते, पण सदाभाऊंप्रमाणे इतर दिग्गज नेत्याच्या मुलांना हार पत्करावी लागली आहे, याकडं दुर्लक्ष करुन चालणार नाही असंही शेट्टींनी नमूद केलंय. राजकारण म्हणजे कुणाची मक्तेदारी नाही, असा टोलाही त्यांनी लगावलाय.
आम्ही राज्यामध्ये निवडणुका लढवत असताना बिन पैशांचा तमाशा केला... त्यामुळं आमचे उमेदवार कमी निवडून आले... भाजपानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना 20 ते 40 लाखापर्यतंची रसद पुरवून उमेदवार निवडून आणल्याचा आरोप शेट्टींनी केलाय.