दानवे यांना काळे झेंडे दाखवून निषेध, संवाद दौरा फ्लॉप

जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या डामरखेडा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह प्रमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. यावेळी दानवेच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी केला. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 25, 2017, 08:49 PM IST
दानवे यांना काळे झेंडे दाखवून निषेध, संवाद दौरा फ्लॉप title=

नंदूरबार : जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या डामरखेडा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह प्रमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. यावेळी दानवेच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी केला. 

रावसाहेब दानवेचे नंदूरबार जिल्ह्यातील संवाद यात्रेची सुरूवात करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.  शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी काळे झेंडे दाखवून केला निषेध करत यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. 

दानवेच्या या संवाद यात्रेत शेतकऱ्यांपेक्षा पोलिसांचाची गर्दी अधिक दिसून आली. यावेळी दानवे अवघडल्याप्रमाणे संवाद यात्रेत दिसून आले. त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विसंवादाचे परिणाम त्यांना नंदूरबार जिल्ह्यात प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. 

धुळ्यातील दानवेच्या संवाद यात्रेला विरोध होत आहे.  शेतकऱ्र्यांपेक्षा पोलिसांचाच बंदोबस्त अधिक असल्याने दावनेचा हा संवाद दौरा एक औपचारिकता असल्याचे दिसून आले.