दहावीच्या निकालाबाबतच्या त्या मेसेजचं सत्य

दहावीचा निकाल एक जूनला लागणार आहे, असा मेसेज गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्स अॅपवर फिरत होता.

Updated: May 30, 2016, 10:08 PM IST
दहावीच्या निकालाबाबतच्या त्या मेसेजचं सत्य

पुणे : दहावीचा निकाल एक जूनला लागणार आहे, असा मेसेज गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्स अॅपवर फिरत होता. या मेसेजबाबत आता बोर्डानं स्पष्टीकरण दिलं आहे. 

व्हॉट्स अॅपवर व्हायरल होणाऱ्या या मेसेजवर विश्वास ठेवू नका, अशी माहिती एसएससी बोर्डानं दिली आहे. 

काय होता तो मेसेज ?

दहावीचा निकाल 1  जून ला

पुणे :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2016  मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवार 01  जून 2016  रोजी दुपारी 1  वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. विध्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून निकालाची प्रत डाऊनलोड करून घेता येईल.

या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध

(1) Www.Mahresult.nic.in

(2) Www.Result.mkcl.Org

(3) Www.Maharashtraeducation.com

(4) Www.rediff.com/exams