डोंबिवली ब्लास्टमधील जखमींवर आणखी एक संकट

डोंबिवली एमआयडीसी येथे प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटात जखमींकडून पैसे घ्या असं सरकारी अधिकाऱ्यांनीच हॉस्पिटल प्रशासनाला सांगितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हॉस्पिटल प्रशासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता. पण सरकारी अधिकाऱ्यांनी जखमींकडून पैसे घ्या असे थेट अलिखीत आदेशच दिलेत. त्यामुळे सर्व हॉस्पिटल्सनी जखमींना पैसे भरण्यास सांगितल्याचं सुत्रांनी सांगितलंय. त्यामुळे सर्वच जखमींच्या नातेवाईकांना पैशांसाठी धावपळ करावी लागत आहे. 

Updated: May 30, 2016, 08:53 PM IST
डोंबिवली ब्लास्टमधील जखमींवर आणखी एक संकट title=

ठाणे : डोंबिवली एमआयडीसी येथे प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटात जखमींकडून पैसे घ्या असं सरकारी अधिकाऱ्यांनीच हॉस्पिटल प्रशासनाला सांगितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हॉस्पिटल प्रशासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता. पण सरकारी अधिकाऱ्यांनी जखमींकडून पैसे घ्या असे थेट अलिखीत आदेशच दिलेत. त्यामुळे सर्व हॉस्पिटल्सनी जखमींना पैसे भरण्यास सांगितल्याचं सुत्रांनी सांगितलंय. त्यामुळे सर्वच जखमींच्या नातेवाईकांना पैशांसाठी धावपळ करावी लागत आहे. 

२६ मे रोजी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जख्मींची भेट घेवून त्यांचा सर्व खर्च सरकार करेल असं आश्वासन दिले होते. पण ही माहिती समोर आल्याने नेमके काय आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे हा आता चर्चेचा विषय बनलाय.