सत्तेसाठी भाजपला दिला साई पक्षाने पाठिंबा

 उल्हासनगरमध्ये भाजपचा महापौर सत्तेवर येणार, हे आता स्पष्ट झालंय.. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 24, 2017, 10:35 PM IST
सत्तेसाठी भाजपला दिला साई पक्षाने पाठिंबा title=

उल्हासनगर :  उल्हासनगरमध्ये भाजपचा महापौर सत्तेवर येणार, हे आता स्पष्ट झालंय.. 

सत्तेचं समीकरण जुळवण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय साई पक्षानं घेतलाय. साईचे नेते जीवन इदनानी यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

त्यांच्यासोबत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण देखील होते. विकासाच्या मुद्यावर आम्ही भाजपला पाठिंबा देत आहोत, असं इदनानींनी स्पष्ट केलं. 

78 नगरसेवकांच्या उल्हासनगर महापालिकेत भाजप आघाडीला 32 जागा मिळाल्यात. बहुमतासाठी 39 जागांची गरज होती. 

साई पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आलेत. त्यांच्या पाठिंब्यामुळं आता भाजपप्रणित आघाडीतल्या नगरसेवकांचं एकूण संख्याबळ 43 वर पोहोचलंय...

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x