हफ्ते मिळतात? त्यामुळे काही पोलीस गुन्हा दाखल करण्यास कचरतात?

वाळू माफियांकडून पाचोरा पोलिसातील काही अधिकाऱ्यांना वाळूचे हफ्ते येतात की काय? असा प्रश्न पडतोय. कारण वाळू माफियाने शेतकऱ्याचा डोळा फोडला, मात्र १० दिवस उलटूनही पोलिस शेतकऱ्याची तक्रार घ्यायला तयार नाहीत. तसेच निव्वळ साधी तक्रार लिहून घेतली असल्याचा आरोप शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. (व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली)

Updated: Nov 25, 2015, 08:47 PM IST
 हफ्ते मिळतात? त्यामुळे काही पोलीस गुन्हा दाखल करण्यास कचरतात? title=

मुंबई : वाळू माफियांकडून पाचोरा पोलिसातील काही अधिकाऱ्यांना वाळूचे हफ्ते येतात की काय? असा प्रश्न पडतोय. कारण वाळू माफियाने शेतकऱ्याचा डोळा फोडला, मात्र १० दिवस उलटूनही पोलिस शेतकऱ्याची तक्रार घ्यायला तयार नाहीत. तसेच निव्वळ साधी तक्रार लिहून घेतली असल्याचा आरोप शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. (व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली)

मुजोर वाळू माफिया
वाळू माफियाच्या मुजोरीचा संतापजनक प्रकार जळगाव जिल्ह्यात घडलाय. वाळू माफियानं वीट मारून फेकल्यामुळं वृद्ध शेतक-यावर कायमस्वरुपी डोळा गमावण्याची वेळ आलीय.

भांडण मिटवण्यासाठी गेले पण?
जळगावच्या पाचोरा तालुक्यातल्या पुनगावमध्ये वाळूमाफियांमधलं भांडण मिटवण्यासाठी प्रल्हाद पाटील गेले होते, त्याचाच राग मनात धरुन विनोद परदेशी नावाच्या वाळू माफियानं पाटील यांच्या डोळ्यावर वीट फेकून मारली.

दृष्टी परत येण्याची शक्यता कमी?
या वृद्ध शेतकऱ्याच्या डोळ्यावर जळगावात शस्त्रक्रिया करण्यात आली. पण त्यांची दृष्टी परत येण्याची शक्यता धूसर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

वाळू माफियाची दहशत
वाळूचा अवैध उपसा करून गावकऱ्यांवर धाक जमविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळू माफियांची एवढी दादागिरी वाढली असताना, पाचोरा पोलीस मात्र कोणतीही कारवाई करायला तयार नाहीत, यामुळे संतप्त नातेवाईक उपोषण करण्याच्या तयारीत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.