भाजपची भूमिका वेगळ्या विदर्भाची : गिरीश बापट

विरोधकांच्या आक्रमकतेमुळे नागपूर हिवाळी अधिवेशनात पहिले चार दिवस कामकाज होऊ शकले नाही. दरम्यान, वेगळ्या विदर्भाबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. जय विदर्भ vs जय महाराष्ट्र असा नारा घुमला. त्याचवेळी भाजप वेगळ्या विदर्भावर ठाम असल्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी म्हटलेय.

Updated: Dec 10, 2015, 07:05 PM IST
भाजपची भूमिका वेगळ्या विदर्भाची : गिरीश बापट title=

नागपूर : विरोधकांच्या आक्रमकतेमुळे नागपूर हिवाळी अधिवेशनात पहिले चार दिवस कामकाज होऊ शकले नाही. दरम्यान, वेगळ्या विदर्भाबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. जय विदर्भ vs जय महाराष्ट्र असा नारा घुमला. त्याचवेळी भाजप वेगळ्या विदर्भावर ठाम असल्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी म्हटलेय.

नागपूर हिवाळी अधिवेशनात पहिले चार दिवस कामकाज होऊ शकले नाही. ही कोंडी उद्या फुटेल, असा दावा गिरीश बापट यांनी केलाय. दरम्यान, विधानपरिषदेत विदर्भावरील प्रश्न कामकाजातून वगळल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार माणिकराव ठाकरे गिरीश बापट यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करणार आहेत. 

मात्र, वेगळ्या राज्याचा मुद्दा केंद्राशी संबंधित असल्याने तो वगळण्यात आलाय. नियमानुसारच हा मुद्दा वगळण्यात आल्याचा दावा बापट यांनी केला आहे. तर वेगळ्या विदर्भाबाबत जनसंघापासून आमची भूमिका स्पष्ट आहे, असे बापट म्हणालेत. 

लहान राज्यांच्या निर्मितीस भाजप अनुकूल आहे. भाजप वेगळ्या विदर्भाच्या बाजूने असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे वेगळ्या विदर्भाबाबत शिवसेनेशी मतभेद आहेत. मात्र, मनभेद नाहीत, असेही बापट यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.