आश्रमशाळेत शिक्षकाकडून अल्पवयीन शाळकरी मुलीचं लैंगिक शोषण

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचं प्रकरण ताजं असतानाच बीडमधल्या आश्रमशाळेत देखील अशीच घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातल्या सिंदफना इथं उसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या आश्रमशाळेत पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलींसोबत शिक्षकच अश्लिल चाळे करत असल्याचं उघड झालं आहे.

Updated: Jan 15, 2017, 07:40 PM IST
आश्रमशाळेत शिक्षकाकडून अल्पवयीन शाळकरी मुलीचं लैंगिक शोषण title=

बीड : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचं प्रकरण ताजं असतानाच बीडमधल्या आश्रमशाळेत देखील अशीच घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातल्या सिंदफना इथं उसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या आश्रमशाळेत पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलींसोबत शिक्षकच अश्लिल चाळे करत असल्याचं उघड झालं आहे.

देवराम म्हस्के असं या नराधमाचं नाव आहे. या प्रकरणाची तक्रार बीडच्या समाज कल्याण सहआयुक्तांकडे करण्यात आली आहे.. संस्थाचालक राजकुमार पालवे यांना याची माहिती दिल्यानंतर म्हस्केला निलंबित करण्यात आलं आहे. मस्के विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. या आश्रमशाळेत एकूण 36 मुली आहेत. तिथं एकही महिला कर्मचारी नसल्यानं पुरुष शिक्षकच आळीपाळीनं रात्रीच्या वेळी ड्युटी करतात. मस्के आठवड्यातून दोन दिवस आश्रमशाळेत ड्युटीवर असायचा. तेव्हा तो दारू पिऊन येत असल्याची तक्रार मुलींनी केली आहे. मस्के फरार झाला आहे.