सांगली : जिल्ह्यातील भिलवडी येथील अल्पवयीनं मुलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रशांत उर्फ़ हिमेश सोंगटे असं आरोपीचे नाव आहे. आरोपीने बलात्कार करून खून केल्याचं निष्पन्न झालंय. आरोपी विरोधात 9 पुरावे मिळाले आहेत. सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी या प्रकरणी महत्वाची माहिती दिली.
आठ दिवसानंतर पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आलं. संपूर्ण सांगली जिल्ह्यासह राज्यात या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. सोशल मीडियावरही या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. नागरिकांनी काही संघटनांनी मोर्चाही काढला होता. पोलीस अधिक्षकांसह अनेक वरीष्ठ अधिकारी या प्रकरणाच्या तपासात लक्ष घालून होते. महत्वाची बाब म्हणजे सोशल मीडियावर अफवा पसरवून, सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न होत होता. मात्र पोलिसांनी योग्य तपास करून खरा आरोपी पकडला आहे. आरोपी प्रशांत उर्फ़ हिमेश सोंगटेला सांगली विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी प्रशांतला 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.