हा देश मुख्यमंत्र्यांच्या खाजगी मालकीचा आहे का?

Updated: Aug 22, 2016, 05:39 PM IST

पुणे : गाईला आई म्हणत नसेल, तर त्याने देशात राहु नये, असं एका मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य वाचलं. मात्र हे सांगण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला...?, असा सवाल शरद पवार यांनी विचारलाय.

हा देश त्यांच्या खाजगी मालकीचा आहे का, अशा शब्दांत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय.

त्रिदल पुणेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. हा पुरस्कार जेष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना प्रदान करण्यात आला.