शिवसेना नेते बुडगुजर यांना अटक

शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांना अटक करण्यात आली आहे, त्यांना भाजपाच्या महिला मेळाव्यात शिवसैनिकांनी धुडगूस घातल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

Updated: Apr 5, 2016, 02:02 PM IST
शिवसेना नेते बुडगुजर यांना अटक title=

नाशिक : शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांना अटक करण्यात आली आहे, त्यांना भाजपाच्या महिला मेळाव्यात शिवसैनिकांनी धुडगूस घातल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी वेगळ्या मराठवाड्याचे समर्थन केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता, त्याचवेळी त्यांनी नाशिकमधील भाजपाच्या महिला मेळाव्यात धुडगूस घातला होता.  

शिवसैनिकांनी केलेल्या खुर्च्यांच्या फेकाफेकीत महिला आणि मुलं जखमी झाली होती. पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड सुरू केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोषींवर त्वरित कारवाई करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते हटून बसले होते, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

मात्र त्यांच्या बडगुजर यांच्या अटकेनंतर नाशिक शहरात तणावाचे वातावरण आहे. बडगुजर यांच्या अटकेला विरोध दर्शवत शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.