Jyeshtha Purnima 2024 : हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व असून या दिवशी पूर्ण चंद्राचं दर्शन घडतं. धार्मिक मान्यतेनुसार, हा दिवस अत्यंत शुभ मानला गेला असून ज्येष्ठ पौर्णिमेच्या (Jyeshtha Purnima 2024) दिवशी गंगास्नान करणं, सत्यनारायण कथा वाचन, दान करणे अतिशय शुभ मानले जाते. त्यासोबत पौर्णिमेला लक्ष्मीसोबत कुबेराची (Kuber) पूजा केल्यास फायदेशीर ठरते. ज्येष्ठ पौर्णिमेला संध्याकाळी शुभ मुहूर्तावर चंद्राला अर्घ्य दिल्यास लाभ मिळतो, असं शास्त्रात सांगण्यात आलंय. आज ज्येष्ठ पौर्णिमेला मिथुन राशीमध्ये बुध आणि शुक्राच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण झाला आहे. हा लक्ष्मी नारायण राजयोग तीन राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली सिद्ध होणार आहे. (Jyeshtha Purnima 2024 Lakshmi narayan yog Kubera blessings 3 zodiac signs will become rich)
या राशीला ज्येष्ठ पौर्णिमा लाभदायक ठरणार आहे. वडिलोपार्जित वादातून तुम्हाला आराम मिळणार आहे. आर्थिक स्थिती बळकट होण्यासाठी अनेक नवं मार्ग गवसणार आहे. धार्मिक स्थळाला भेट देणार आहात. परदेशवारीचेही योग आहेत. जोडीदारासोबतचं नातं अधिक मजबूत होणार आहे.
या राशीला ज्येष्ठ पौर्णिमेचा थेट लाभ मिळणार आहे. तुमची मानसिक चिंतेतून सुटका होणार आहे. आयुष्यात सकारात्मक वातावरण असणार आहे. कुबेर आणि लक्ष्मीच्या कृपेने नशिबाची साथ मिळणार आहे. शिवाय उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. करिअरमध्ये काही समस्या असेल तर त्या दूर होणार आहे. व्यावसायिकांसाठीही लक्ष्मी नारायण योग लाभदायक ठरणार आहे.
या राशीसाठी ज्येष्ठ पौर्णिमेला जुळून आलेला लक्ष्मी नारायण राजयोग शुभ ठरणार आहे. तुम्हाला अचानक आर्थिक फायदा होणार आहे. तुमच्या व्यवसायात चांगली वाढ होताना दिसून येणार आहे, त्यामुळे तुम्ही चिंतामुक्त होणार आहात. एखादं काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते आता मार्गी लागणार आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढणार असून वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असेल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)