शहीद सूरज मोहितेंच्या पार्थिवावर मूळगावी अंत्यसंस्कार

कटुवा जम्मू काश्मीर इथं अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या जवान सूरज मोहिते यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्यावतीनं त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यापूर्वी शहीद सूरज मोहिते यांचं पार्थिव त्यांच्या मुळगावी गणेशवाडीत सकाळी ११ वाजता दाखल झालं.

Updated: Mar 22, 2015, 09:42 PM IST
शहीद सूरज मोहितेंच्या पार्थिवावर मूळगावी अंत्यसंस्कार title=

कटुवा जम्मू काश्मीर इथं अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या जवान सूरज मोहिते यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्यावतीनं त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यापूर्वी शहीद सूरज मोहिते यांचं पार्थिव त्यांच्या मुळगावी गणेशवाडीत सकाळी ११ वाजता दाखल झालं.

गावकऱ्यांनी सूरजच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शसानासाठी मोठी रांग लावली होती.  शहिद सूरज अवघ्या बावीस वर्षांचे होते. सातारा जिल्ह्यातल्या वाई इथल्या सिद्धनाथवाडी या त्यांच्या जन्मगावी, त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कर करण्यात आले. 

यावेळी हजारो ग्रामस्थांबरोबर साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, वाईचे आमदार मकरंद पाटील आणि केंद्रीय राखीव दलाचे अधिकारी उपस्थित होते. 'शहीद सूरज जवान अमर रहे'च्या जय घोषात अंत्ययात्रा काढण्यात आली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.